एखाद्या व्यक्तीला जमीन आहे ती त्याच्या मुलाच्या नावे करायचे आहे व मुलांच्या नावे जर ती जमीन करायची तर त्यांनी हक्क सोडपत्र करावं की बक्षीस पत्र (Release Deed and Gift Deed) योग्य राहील कोणत्या पद्धतीने मुलांच्या नावे ती जमीन केल्यास जास्त फायदा होईल आणि खर्च कमी होईल आणि सुरळीतपणे अगदी वेगाने किंवा अगदी जलद पणे ती जमीन त्या मुलांच्या नावे होऊ शकेल तर असाच हक्क सोड आणि बक्षीस पत्राच्या बाबतीत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आई-वडिलांना जमीन त्यांच्या मुलाच्या नावे करायचे असते तर त्यावेळेस त्यांच्या मनात दोन प्रश्न पडतात की हक्क सोडणे आपण त्या ठिकाणी करावं की बक्षीस पत्राने करावं कशाला कमी खर्च लागतो किंवा कोणत्या कंडिशन मध्ये आपण हक्क सोडपत्र देऊ शकतो कोणत्या कंडिशन मध्ये आपण बक्षीस पत्र देऊ शकतो असे असंख्य प्रश्न जमिनीच्या वाटपाच्या बाबतीत त्या ठिकाणी येत असतात.चला तर मग आपण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
हक्क सोड पत्र म्हणजे काय असत ?
आपला हिस्सा जर आपण एखाद्या कायदेशीर वारसाला जर द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण हक्क सोड पत्राने एका कायदेशीर वारस दुसऱ्या कायदेशीर वारसाला ती त्या ठिकाणी जमीन किंवा मालमत्ता देऊ शकतो. हक्कसोड पत्रा मध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हक्कसोड पत्र हे मात्र वडिलोपार्जित मालमत्तेसाठीच त्या ठिकाणी वापरले जाते.
बक्षीस पत्र म्हणजे काय? आणि हे केव्हा वापरले जाते.
आपल्या नावावर असलेली म्हणजे स्वतः त्या ठिकाणी मेहनतीने मिळवलेली आपल्याला आई बापाकडून न मिळालेली अशी जर मिळकत असेल आणि ती आपण कोणताही मोबदला न घेता दुसऱ्या व्यक्तीला ती देतो तर त्याला आपण बक्षीस दिली असं समजलं जातं या कृती सुद्धा बक्षीस देणं असं सुद्धा म्हणतात आणि यावेळेस यासाठी तुम्हाला बक्षीस पत्राचा दस्तऐवज त्या ठिकाणी तयार करावा लागत असतो.
मग हक्क सोडपत्र आणि बक्षीस पत्र Release Deed and Gift Deed यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की हक्क सोडपत्र हे अशा वेळेस वापरावं लागतं की ज्या वेळेस ही जमीन वडिलोपार्जित असते आणि बक्षीस पत्र अशा वेळेस वापरायचं असतं की ज्यावेळेस तुमची जी काही जमीन झूमला मालमत्ता आहे ती स्वतः चा असतातो म्हणजे तुम्हाला आई-वडिलांकडून मिळालं नाही हि तुम्ही स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी बनवलेले आहे.
हक्कसोड आणि बक्षीस पत्र या दोन्हीसाठी किती मुद्रांक शुल्क लागतो. Release Deed and Gift Deed
How much stamp duty is charged?
या मध्ये आपल्याला हक्कसोड आणि बक्षीस पत्र Release Deed and Gift Deed बद्दल लागणारे चार्जेस बद्दल बघुया स्वतःच्या कष्टाने घेतलेली जी काही मालमत्ता आहे तर तिचं बक्षीस पत्र त्या ठिकाणी आपण काहीही मोबदला न घेता आपण आपल्या नात्यात त्या ठिकाणी दिलं मग ते पतीला पत्नीला मुलाला मुलीला नातवाला नातीला जर आपण दिलं असेल तर त्यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार अधिभार वगळता मुद्रांक मूल्यात मोठे सवलत या ठिकाणी मिळते. यासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्क फक्त 200 रुपये त्या ठिकाणी आकारला जात असून पण जर हेच बक्षीस पत्र तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्याच्या व्यतिरिक्त जर लोकांना कोणाला दिले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क तसेच आयकर सुध्दा भरावा लागेल.
या बरोबर असेल आणि तिचा जर हक्क सोड पत्र त्या ठिकाणी कायदेशीर वारसाच्या त्या ठिकाणी जर पद्धतीने जर तुम्ही केलं तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमनुसार तुम्हाला आधीपण सोडून 200रुपये इतका मुद्रांक शुल्क त्या ठिकाणी लागत असतो
याबरोबरच हक्कसोड आणि बक्षीस पत्र Release Deed and Gift Deed याच्यामधला अजून एक अगदी महत्त्वाचा जो काही फरक आहे तो म्हणजे की बक्षीस पत्र हे ज्याला द्यायचे तो व्यक्ती हयात असला पाहिजे म्हणजे जो व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीस बक्षीस देऊ शकतो. पण हक्क सोडपत्र हे तुम्ही त्या ठिकाणी जे काय व्यक्ती आहे ज्याच्या नावावर ते प्रॉपर्टी कालपर्यंत होती तो नसत्ताना सुद्धा त्याचा दुसरा कायदेशीर वारस हक्क सोड पत्रानुसार त्या ठिकाणी कारवाई करू शकतो.