Mahajyoti Free Tablet Yojana 2024: मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता JEE/NEET/MHT-CET BACH-2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे.त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व दररोज सहा जीबी इंटरनेट डाटा देखील दिला जाणार आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana 2024 योजनेच्या कोण राहतील पात्र
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
- सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर परीक्षेच्या लाभ करिता रात्र राहतील
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतचे कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त झालेल्या टक्केवारीनुसार सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे
- इयत्ता दहावी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70 टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील हे त्यांच्या आधार कार्ड वरील सत्यानुसार ठरविण्यात येईल
Mahajyoti Free Tablet Yojana 2024 अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
- समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे राहील
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहेत
- अनाथांकरिता एक टक्के जागा आरक्षित करण्यात आले आहेत
Mahajyoti Free Tablet Yojana 2024 अर्ज कसा करावा
महा ज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ‘application for JEE NEET MHT-CET -batch 2026’ training यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्ज सोबत वरील नमूद सर्व कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे जे की स्कॅन करून सुस्पष्ट दिसतील असे असावे.
Mahajyoti Free Tablet Yojana 2024 काय आहेत अटी व शर्ती
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10/07/2024 आहे.
- पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही
- जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे हे सर्व निवड पद्धतीबद्दल सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील