Know Benefits of Filing Income Tax Return : सगळ्यात पहिला म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणा अनिवार्य आहे का आणि नंबर दोन जरी अनिवार्य नसेल तुमच्यासाठी तर जर तुम्ही आपण इन्कम टॅक्स भरला तर त्याचे काही फायदे आहेत का नाही येत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.
आता इन्कम टॅक्स रिटर्न भरणा अनिवार्य आहे का नाही याच्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा सोप्या भाषेत समजून घेऊया
इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे हा एका प्रकारचा फॉर्म भरण्यासारखा असतो. जो तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न ऑफिसला भरायचा असतो. पहिले हे सर्व काही फिजिकली असायचं परंतु आता ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता.
अस आहे की हा एक सेल्फ असेसमेंट पद्धतीचा फॉर्म असतो म्हणजे काय की या अख्या वर्षात म्हणजेच एक एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये मी एवढं इन्कम कमावल माझं उत्पन्न याच्यावरती आला मला एवढा टॅक्स येतोय. म्हणून याला सेल्फ असेसमेंट फॉर्म असे म्हणतात.
आता आपण फायदे बघणार आहोत Know Benefits of Filing Income Tax Return
- 1) टीडीएस परत मिळविण्यासाठी
आता तुम्ही एखाद्या बँकेत एफडी ठेवली असेल म्हणजेच मुदत ठेव असेल आणि तुम्ही जर तो फोन 15g के 15 भरला नसेल तर तुमचा टॅक्स कापला जातो तुमचा टीडीएस केला जातो. आता तुम्ही बँकेला असं नाही म्हणू शकतो आता मला टॅक्स परत पाहिजे. बँक तुम्हाला परत नाही देणार तुम्हाला जर हा टॅक्स तुमचा जो ऑलरेडी कापला गेलेला आहे तो जर परत हवा असेल तर तो तुम्हाला सरकारकडनं परत घ्यायला लागतो आणि ते कसं घेणार इन्कम टॅक्स फाईल भरून तुम्ही परत मिळऊ शकता.
- 2) कर्ज काढण्यासाठी
अशावेळी जनरली बँक तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स पाहण्यासाठी तुम्हाला पुरावा मागते म्हणजेच इन्कम दाखवण्यास सांगते. आता तुम्ही त्याच्यासाठी काय देऊ शकता त्यासाठी तुम्ही फॉर्म नंबर 60 देऊ शकता किंवा सॅलरी सर्टिफिकेट देऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा देऊ शकता
- 3) शिष्यवृत्ती
तुमच्या पोरांना बाळांना शिष्यवृत्ती मिळणार असेल तर तिथेही काही वेळ असत की उत्पन्न जर अमुक अमुक असेल तरच तर शिष्यवृत्ती मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही प्रूफ कसं करणार की माझे उत्पन्न कीती आहे.त्या साठी इन्कम टॅक्स रिटर्न असणे गरजेचे आहे.
शेवटची तारीख किती असते
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय तर या हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै च्या आत तुम्ही भरू शकता. ही तारीख सगळ्यांसाठीच नसते परंतु जनरली सर्वसामान्य माणसांसाठी तसेच किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 31 जुलै ही शेवटची तारीख असते.