farmers best government schemes: आपण पाहत होतो की शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना घ्या वेगवेगळया कार्यकाळासाठी या राबविल्या जात असतात ज्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो तसेच शासन अनुदानाच्या स्वरूपात तसेच विविध योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हे सतत करत असतो जेणेकरून आपला बळीराजा हा आर्थिक संकटातून दूर कसा होईल या दृष्टीने काम केल्या जात असते असेच काही योजना आज आपण पाहणार आहोत.
पहिली योजना ती म्हणजे शेतकरी सन्मान योजना farmers best government schemes
खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. जेणेकरून पेरणी पाण्याच्या दिवशी शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत होईल. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीन किस्त मध्ये पैसे मिळतात. दरवर्षी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान मिळतो दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान मिळत असतो. मात्र पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना सर्वप्रथम नोंद करणे गरजेचे आहे.
पी एम किसान चे पैसे कोणत्या बँकेत गेले व कधी गेलेत हे कसे शोधावे?
खूप सारे शेतकऱ्यांना अडचण येत आहे की त्यांचे पैसे त्यांच्या चालू खात्यामध्ये येत नाहीत तर ते दुसऱ्याच खात्यावरती जात आहे अशावेळी शेतकऱ्यांनी जिथे आपण शेवटचे बँक खाते ओपन केले असेल त्या बँकेमध्ये एकदा भेट देऊन चेक करून घ्यावे तरीसुद्धा आपल्याला सापडत नसल्यास आम्ही तुम्हाला लिंक देत आहोत तिथे जाऊन चेक करावे.
पी एम किसान स्टेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरी योजना आहे महा डी बी टी योजना farmer mahadbt scheme
हि एक farmers best government schemes आहे पण महा डी बी टी म्हटल की,आपल्या डोक्यामध्ये फक्त ठिबक योजना येते परंतु असे नसून या अंतर्गत विविध योजना येतात आणि त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतलाच पाहिजे. आता आपण बघूया याअतर्गत कोणकोणत्या योजना आपण मिळू शकतो.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
राष्ट्रीय कृषी विकास योजना
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
तसेच इतर विविध प्रकारचे योजना देखील या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील याची लिंक आम्ही खाली येत आहोत यावरती जाऊन आपण चेक करू शकता.
महा डीबीटी योजना लिंक साठी येथे क्लिक करा
तिसरी योजना आहे प्रधान मंत्री फसल बिमा योजना pradhan mantri fasal bima yojana
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) ही मागणीवर आधारित योजना आहे आणि ती राज्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. म्हणजेच कोणी शेतकरी जर आपल्या शेत मध्ये आपल्या मालाला सौरक्षण म्हणून हा विमा काढू शकतो.या साठी पहिले शासनाकडून 50% सवलत मिळत होती परंतु आता शेतकऱ्यांच्या साठी शासनाने हि योजना फक्त आणि फक्त १ रुपया मध्ये ठेवली आहे म्हणजेच आता शेतकरी या साठी CSCकेंद्रावर जाऊन फक्त १ रुपया देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
प्रधान मंत्री फसल बिमा योजना साठी लागणारे कागद पत्रे कोणती ?
आधार कार्ड
बँक पास बुक
सात बारा व होल्डिंग
स्व घोषणा पत्र