MH Gov Budget 2024: लोकसभेच्या झालेल्या इलेक्शन च्या निकाला नंतर समोरील विधान सभेचा विचार करत सरकारने सावध भूमिका घेत महाराष्ट्राचे अर्थ मंत्री अजित दादा पवार यांनी अधिक चा अर्थ संकल्प सदर करत असताना विविध योजनाची घोषणा केली असून त्या मध्ये महिला,तरुण वर्ग व तसेच शेतकऱ्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत जी कि आता सरकार साठी गेम चेंजर ठरू शकते मध्यप्रदेश मध्ये यश्स्वी ठरलेली लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रा मध्ये पण सुरु करण्याची घोषणा अजित दादा पवार यांनी आज घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना काय म्हणाले अर्थ मंत्री अजित पवार
स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाच व्यवस्थापन अर्थात अशा विविध आघाड्यांवर ती लढते आहे एक हाती कुटुंबात सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रथम महिना आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे.
MH Gov Budget 2024 माझी बहीण लाडकी योजने बद्दल अधिक माहिती
असे सांगितले जात आहे कि,या योजने अंतर्गत ९५ लाख महिलांना याचा डायरेक्ट फायदा होणार असून त्याच्या खात्य मध्ये १५०० रु जमा करण्यात येणार आहेत. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आल्याच पवार साहेब म्हणाले या योजनेत 21 ते 60 वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.