शेतकऱ्यांना कर्ज माफी: मागील काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन शासनाने शेतकऱ्यांना एक नव्याने उभारणी देण्यास हातभारच लावला म्हणाल्या हरकत नाही.शेतकऱ्यांना महात्मा जोतीबा फुले कर्ज माफी योजने अंतरगत जे धकीत शेतकरी होते यांना २,००,००० दोन लाख रुपया पर्यंत कर्ज माफी करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना कर्ज माफी विषयाला सुरुवात कुठून झाली
परंतु आता नव्याने कर्ज माफी च्या विषयास चर्चेस उधान आले असून हे कशा मुळे तर,झारखंड मध्ये येऊन ठेवलेल्या इलेक्शन मुळे तेथील मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्याचे संकेत दिले आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी २०० युनिट पर्यंत विज देण्याची घोषणा केली आहे. ते जमशेद पूर येथील गांधी मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.तसेच दुसरी कडे महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील १५ ओगस्ट पूर्वी कर्ज माफी देऊ असे आश्वासन दिले होते.तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना बोलावून दोन लाखाच्या आतील शेतकर्याची यादी बनवायला सांगितले आहे .या मुळे या दोन्ही राज्यांनी शेतकरी कर्ज माफी ला जोर धरला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज माफी आश्वासन नाही झाले पूर्ण
या कारणाने महाराष्ट्र राज्याती शेतकऱ्यांनी कर्ज माफीची चर्चा सुरु केली आहे,परंतू राज्यातील सरकार ने अजून या गोष्टीवर मौन धरले आहे .तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर देखील दोन लाखापर्यत कर्ज माफी केली होती.या नंतर नवे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यांनी गेल्या वर्षी च्या पावसाळी आधीवेशनात शेतकऱ्यांचे ६.५ हजार कोटी पर्यत चे कर्ज माफी चे आश्वासन दिले मात्र अमलात आणता आले नाही .
झारखंड आणि तेलंगाना राज्यातील होऊ ठेपलेली कर्ज माफी आता महाराष्ट्रातील शेतकरी देखील कर्ज माफीची मागणी आता धरू लागले आहे .शेतकऱ्याच्या मागणी कडे लक्ष न दिल्यास कावड यात्रे नंतर शेतकरी नेते टीकेत यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.त्या मुळे सरकार आता या कडे गांभीर्याने लक्ष देत आहे.