जस जसे परिवार मोठे मोठे होत आहेत त्या पद्धतीने शेतामधील विभागणी होत आहे आणि त्यामुळे शेत रस्ते (shet rasta) वाढत चालले तसेच प्रत्येक शेतकऱ्यांला कधी ना कधी एक समस्या येथेच ती म्हणजे की शेत रस्त्याची जसे की एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेता मधून जाण्यासाठी रस्ता देत नसतो अशावेळी त्रस्त शेतकऱ्याने आम्ही सांगितल्या प्रमाणे अर्ज करून शेतामध्ये जाण्यासाठी सुरळीत रस्ता करून घेता येईल चला तर मग बघूया कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येईल .
स्वतःच्या शेत जमिनी मध्ये जाण्यासाठी जर शेत रस्ता (shet rasta) उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार तुम्ही नवीन रस्त्यासाठी अर्ज करू शकतात आणि या अर्जानुसार तुम्हाला हा शेत रस्ता म्हणजेच शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो यासाठी लागणारा जो अर्ज आहे तो तहसीलदारांकडे तुम्हाला करायचा असतो.
अर्ज करायचा म्हटलं तू म्हणाला अर्ज कसा करायचा तो कसा लिहायचा तर त्यासाठी परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुजय कुंडेटकर यांनी महसूल कामकाज पुस्तिका लिहिलेले आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी हा अर्ज कसा करायचा याविषयी माहिती सांगितलेला आहे तर त्याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन आपण सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा तो पाहूया त्यानंतर कोणते कागदपत्रे याला जोडायचे ते पाहूयात आणि त्यानंतर किती वेळा मध्ये तुम्हाला रस्ता भेटू शकतो हा जर रस्ता तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही काय प्रक्रिया करू शकता हे आपण बघूया.
शेत रस्त्या साठी तहसीलदार साहेबांना करावयाचा अर्ज (shet rasta)
प्रति,
माननीय तहसीलदार साहेब,
तालुका,……….
अर्ज-महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करीत आहे.
विषय-शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळणे बाबत.
नाव-
पत्ता-
गट क्रमांक-
क्षेत्र-
महोदय,
की माझं नाव ………………… आहे मी या ………..,.गावात राहतो या गावांमध्ये माझ्या मालकीची हेक्टर ……….. आर शेत जमीन आहे तर सदर जमिनीमध्ये जाण्या येण्यासाठी गाव नकाशावर मला रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे माझ्या शेतात बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मधून शेती अवजार बी बियाणं रासायनिक खत नेण्यासाठी मोठे अडचण निर्माण होत आहे तसेच माझ्या शेतामधनं जे उत्पादित झालेले धान्य आहे ते शेतामधनं बाहेर जाण्यासाठी विशेष अडचणी त्या ठिकाणी येत आहे तरी मला माझ्या गट नंबर मधून पूर्व पश्चिम धुर्या त्याच्या हद्दी वरून गाडी बैल येईल असा कायमस्वरूपी चा शेत रस्ता मंजूर करण्यात यावा आपणास ही मी विनंती करत आहे.
आपला विश्वासू
शेत रस्त्यासाठी (shet rasta) अर्जासोबत लागतील ही चार महत्त्वाची कागदे
- १)अर्जदाराच्या जमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा
- २)दुसरा कागद म्हणजे शेत जमिनीचा चालू वर्षातील सात बारा उतारा
- ३)तिसरा म्हणजे लगतच्या शेतकऱ्याचे नाव व पत्ता तुम्हाला द्यावा लागेल.
- ४)तसेच जमिनी बाबत जर न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्रासह तहसीलदारांना द्यावी
शेत रस्ता (shet rasta) किती दिवसांमध्ये तहसीलदार साहेब तुम्हाला मिळून देऊ शकतो
तुम्ही अर्ज दिल्यानंतर तहसीलदार सदरील शेतकऱ्यास एक नोटीस काढून त्याचे म्हणणे मांडण्यासाठी त्याला एक अधिकार देईल तसेच अर्जदाराला शेतामध्ये जाण्यासाठी खरोखर रस्ता आहे की नाही त्याचे देखील माहिती तहसीलदार साहेब मिळतात. त्यानंतर तहसीलदार तुमच्या शेत रस्ता अर्जावर प्रक्रिया करतात. जेव्हा सर्व काही बरोबर आहे असे कळते तेव्हा तहसीलदार साहेब शेत रस्ता देण्याचे आदेश काढतात त्याचबरोबर दुसऱ्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याचीसुद्ध तहसीलदार दखल घेत असतात. यामध्ये शेतकऱ्याला आठ फुटापर्यंत रस्ता दिला जातो ज्या मधून तुमची बैलगाडी सुरळीतपणे जाऊ शकेल.
शेत रस्त्यासाठी (shet rasta) चा अर्ज जर आपला फेटाळला तर काय करावे?
तुम्ही जो काही त्यांनी आदेश दिलेला आहे तर त्या आदेशावरून अपील देखील करू शकता तर यासाठी तुम्हाला जो आदेश दिलाय तो जर तुम्हाला मान्य नसेल तर आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजेच दोन महिन्याच्या आत तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येते.