कोणत्याही लहान मुलाला विचारलं की तुला मोठा पण एक काय व्हायचं तर तो म्हणतो मला पोलीस व्हायचा किंवा पायलट व्हायचं पण तो मोठा व्हायला लागतो आणि तो आठवी नववी मध्ये गेल्यानंतर थोडेफार आयडिया यायला लागते की आपल्याला नेमकं हवंय काय आणि आपल्याला नेमकी आवड कशामध्ये आहे मुलीला नेमकी गती कशामध्ये आहे खूप साऱ्या मुला मुलींना आणि त्यांच्या पालकांना असं वाटतं की यांनी मोठे होऊन इंजिनियर बनायला पाहिजे. पण नुसतं इंजिनियर म्हणून नाही तर ऍडमिशन जर का मिळाली तर आयआयटी IIT मध्येच मिळायला हवी असा सुद्धा त्यांचा आग्रह असतो आणि त्यासाठी नेमकी काय तयारी करायची, तयारी कुठून करायची या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आय आय टी ची स्थापना आणि त्याचा उद्देश…
आय आय टी IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा उच्च शिक्षणासाठी आपल्या देशातील सर्वात मोठा ब्रँड आहे यासोबतच जगभर सुद्धा हा ब्रँड नावाजलेला आहे आणि आपल्या देशामध्ये या आयटीच्या एकूण 23 संस्था आहेत 1951 मध्ये खडकपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था ही पहिल्यांदा स्थापन झाली आणि आयआयटी IIT इथं इंजिनिअरिंग करणारे आपल्या देशातील जे सर्वाधिक हुशार मुला आहेत किंवा जे मिरीट मुल आहेत ते सर्वच्या सर्व जण ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात इथे ऍडमिशन घेतलेले किंवा इथून पास झालेले मुले आहेत या मुलांचा जगभर धबधबा आहे आणि एकूण संशोधन क्षेत्र जे आहे तिथे सुद्धा येथील विद्यार्थ्यांचा फार मोठा धबधबा देशातील इंजिनिअरिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली होती. आजवर या संस्थेने तिचा उद्देश सफल केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल.
किती विद्यार्थी देतात प्रत्येक वर्षी ही परीक्षा ?
फायर प्रो रिपोर्टनुसार आयआयटी IIT मधील विद्यार्थ्यांना अवरेज 20 लाखाच्या आसपास पॅकेज मिळत असतं आणि हेच कारण आहे की बहुसंख्य पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांना आयआयटीमध्ये ऍडमिशन मिळवायचे असते त्यासाठीच त्यांचे पालक आणि विद्यार्थी हे सगळे मिळून प्रयत्न करत असतात. येथे ऍडमिशन घेण्यासाठी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतातून 12 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि 2 ते 2.5 लाख विद्यार्थी ऍडव्हान्स परीक्षेसाठी निवडले जातात. दरवर्षी 2 ते 3 लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात पण त्याच्यातील फक्त 15 ते 20 हजार विद्यार्थी हे जेई परीक्षेसाठी जाणीवपूर्वक तयारी करत असतात हे समोर आलेले आहे.
IIT आयआयटी साठी तयारी केव्हापासून करावी ?
परीक्षेसाठी तयारी करता येऊ शकते पण जे तज्ञ आहेत या क्षेत्रातले या परीक्षांमध्ये त्यांच्या अनुभवानुसार आयआयटी IIT साठी ची जर का तयारी करायची असेल तर दोन वर्षांमध्ये त्याच्यासाठीची क्षमता प्राप्त करणं हे खूप सारे विद्यार्थ्यांसाठी हे प्रचंड मेहनतीचं असतं आणि तणावपूर्ण सुद्धा असतं आणि म्हणूनच आठवी नववी दहावी पासून याच्यासाठीची तयारी करायला हवी किंवा प्रयत्न करायला हवी जेणेकरून आयआयटी IIT मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी पुढच्या काळामध्ये कष्ट कमी लागतील.