10th and 12th student : दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना ‘हे’ दाखले; काढून ठेवा अन्यथा वेळेवर येईल अडचण …

letsinfohub.com
2 Min Read

10th and 12th student : बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून सर्वप्रथम मनःपूर्वक शुभेच्छा तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. आत्ताच आपण बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पदार्पण करतात परंतु त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तसेच आपल्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही शासकीय कागदपत्रे काढून ठेवणे आवश्यक असतात ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

10th and 12th student विद्यार्थांना पुढील वाटचालीसाठी लागणारे डॉक्युमेंट जसे की आपण ऍडमिशन घेताना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट तसेच नॅशनॅलिटी हे कागदपत्रे लागतात. तसेच यानंतर आपण शैक्षणिक चालू वर्षांमध्ये शासकीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला व व्हॅलिडिटी असे विविध कागदपत्रे आपल्याला लागतील. तसेच 10th and 12th student सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक डॉक्युमेंटची किमान चार ते पाच झेरॉक्स काढून ते डॉक्युमेंट अटेस्टेड करून ठेवावे जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही.

10th and 12th student ‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे)
  • अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र
  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते)
  • एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते)
  • केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते)
  • भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र
  • अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • शेतकरी प्रमाणपत्र
  • एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र

या साठी लागणार हे डॉक्युमेंट…

A) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे) :-

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्ज
  • फोटो
  • तलाठी अहवाल ( तीन वर्षाचे प्रमाण पत्र साठी केवळ )

B) तहसील रहिवाशी :-

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्ज
  • फोटो
  • TC झेरोक्स

C) अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) :-

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्ज
  • फोटो
  • तहसील रहिवाशी
  • TC झेरोक्स

D) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते) :-

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्ज
  • फोटो
  • ३ वर्षाचे उत्त्पन दाखला तहसील चा
  • TC झेरॉक्स
  • कास्ट झेरॉक्स ( जातीचा दाखला )

E) जातीचे प्रमाण पत्र :-

  • अर्जदार :-
  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • अर्ज
  • अर्जदार वडील :-
  • आधार कार्ड
  • T.C/निर्गम
  • कास्ट झेरॉक्स ( जातीचा दाखला )
  • वडिलांची कास्ट नसल्यास नातेवाईक जोडावे
  • वंशावळ
  • शपत पत्र

या साठी कुठे अर्ज करावा लागेल ?

या साठी आपल्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्रावर आपल्याला अर्ज करता येईल

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *